NUMEROLOGY OF NO.1 IN MARATHI / नंबर १ या अंकाचे अंकाशात्र

                    अंकाश्त्रानुसार प्रत्येक नंबर चा स्वतामध्ये एक अर्थ दडलेला असतो.पण एखाद्या विशिष्ट नंबर च्या प्रभावाखाली जन्म घेतल्याने त्या नंबर ची वैशिष्टे त्या व्यक्तीमध्ये हस्तांतरित होतात त्यामुळे अंकाचा बऱ्याच प्रमाणात तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो. आज आपण मुलांक १ बदल जाणून घेणार आहे मन्हजे या  चा व्यक्ती कसा असतो ,त्याच स्वभाव ,त्याच  करियर ,त्याचात असणाऱ्या काही त्रुटी आणि काही उपाय या सर्व बाबी आपण बघणार आहोत .

                    नंबर १ हा नेहमी नंबर १ च राहतो .ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १ ,१० ,१९, किंवा २८ तारखेला झाला असेल तर त्याचा मुलांक हा १ येतो

१ =१                                                              

१०=१ +०=१

१९= १+९ =१०=१

२८ =२+८=१०=१

नंबर १ हा सूर्याचा नंबर असतो मन्जे ज्याचा मुलांक १ आहे त्याचा स्वामी सूर्य असतो  सूर्य हि सृजनशील शक्ती आहे ,जी इतकी शक्तिशाली आहे कि ती आपल्या  विश्वाला प्रकाश देते,इतके  तेजस्वी कि सूर्य त्याच्या घटकात असताना  आपल्याला दुसरा कोणतेही  ग्रह किंवा तारे क्वचित दिसतात  सूर्य हा ग्रहांचा राजा आहे जो शक्ती आणि उर्जेचे प्रतिक आहे तसेच  मुलांक १ असणारे लोक खूप  तेजस्वी आणि  सुंदर असतात हे लोक दिसायला रुबाबदार असतात  तसेच  हे लोक खूप हुशार आणि जिद्दी असतात.

मुलांक १ असलेले लोक  खूप स्वतंत्र ,स्पर्धात्मक आणि दृध्निचायी असतात .मुलांक १ असणारे  लोक खूप रागीट स्वभावाचे असतात तसेच हे लोक खूप  हळवे पण असतात पण ते कोणासमोर रडत नाहीत कारण राजा कधी रडताना चांगला दिसत नाही .मुलांक १ असणाऱ्या लोकांना इज्जत खूप प्रिय असते ते आपली इज्जतीला खूप जपतात . मुलांक १ असणारे लोक  निडर असतात कोणाला घाबरत नाहीत उलट त्याचा सहवासात येणाऱ्याची ते रक्षा करतात ते एक प्रकारचे सुरक्षा रक्षक असतात परंत्यू जसे ते त्यांचा आवडत्या व्यक्तींची रक्षा करतात तसेच त्याचा विरोधात जे जातील त्यांना ते कधीच माफ करत नाहीत .मुलांक १  असणाऱ्या लोकांना जिंकणे खूप आवडते कारण राजाला कधी हरणे आवडत नसते .या नंबर चे लोक खूप स्वालंबी असतात .अंकाशात्रात सूर्याला वडिलाच दर्जा दिला आहे त्याच हे लोक खूप जबादार असतात ते नेहमी दुसऱ्याची मदत करतात .    

मुलांक १ असणारे लोक कलाकार , विज्ञान, संशोधन या क्षेत्रात चांगले करियर करू शकतात तसेच हे लोक खूप रुबाबदार आणि धाडसी असतात त्यामुळे हे राजकीय नेते तसेच कोणताही व्यवसाय चागली प्रकारे करू शकतात .मुलांक १ असणारी लोकांना कला आणि संगीत याची हि खूप आवड असते.मुलांक १ असणारे लोक हे अष्टपैलू ते कोणतेही काम करू शकतात पण हीच गोष्ट त्याच नेगेटेव पोइन्त पण होऊ शकतात कारण सगळया गोष्टी येत असल्यमुळे काय करावे यात ते गोंधळून जाऊ  शकतात त्यामुळे त्यांनी एकाच कोणत तरी करियर निवडून त्या दृष्टीने पर्यंत करावे.

मुलांक १ या नंबर ला जादुगार मन्हतात कारण यांनी कोणताही काम हातात घेतलं तर ते एक प्रकाचा अविष्कार करतात .मुलांक १ असणाऱ्या व्यक्तींना इतरांच्या तुलनेने पैशाची खूप कमी अडचण येते मनःजे देवाच्या कृपेने ज्यावेळेस त्यांना पैसा पाहिजे त्यावेलास त्यांना तो मिळतो. तसेच  बऱ्याच बाबी मध्ये मुलांक १ असणारे लोक  खूप भाग्यवान आणि गुणांनी भरलेले असतात त्यामुळे त्यांचात खूप अहंकार असतो हाच गोष्टीचा त्याचावर निगेटिव्ह परिणाम होतो आणि त्यांची कामे खराब होतात त्यामुळे त्यांनी या गोष्टीवर थोड काम करून थोडा त्यांचा स्वभावात बदल करावा  आणि  थोडा रागावर कंट्रोल करावा.प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असा एक प्रकारचा हट्टच असतो त्याचा पण त्यांनी हे लक्षात घ्याव कि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे पण त्यासाठी त्यांनी संयम ठेवण खूप गरजेच आहे .या व्यक्ती आपल्या परफेक्ट हिरो किवा परफेक्ट विलन बनायची शक्यता असते .

या व्यक्तींचं राहणीमान उच्च दर्जाचा असते ,या व्यक्ती भौतिक यशाला सर्वाधिक महत्व देतात त्यांना पैसा ,संपत्ती आणि आरामदायक जीवन यांची आवड असते त्यांना चागल्यातळ्य चागाल्या वस्तूंची आवड असते जसे कि महागडे घर ,महागाडी गाडी अशा गोष्टी ते खरेदी करतात फिरायला जातील त्यावेळा महागड्या हॉटेल मध्ये राहतील ,महागडे जेवण करतील अशा सगळ्या गोष्टींची त्यांना खूप आवड असते .

मुलांक १ असणाऱ्या काही प्रसिद्ध व्यक्तीची नावे सागते जेणे  करून तुमच्या लक्षात येईल कि तुम्ही काय करण्यासाठी जन्मलेले आहात. छत्रपती शिवाजी महाराज , इंदिरा गांधी ,बिल गेटस , धीरूभाई अंबानी ,मुकेश अंबानी ,नीता अंबानी, रतन टाटा ,सुश्मिता सेन ,नाना पाटेकर,संजीव कपूर,लता मंगेशकर ,ऐश्वर्या राय ,मिका सिह ,सुंदर पिचाई,अमीर खान , रेखा ,सुनील गावस्कर  ,ओसामा बिन लादेन .

मुलांक १ असणाऱ्या महिला खूप सुंदर असतात .मुलांक १ असणाऱ्या महिला वाघिणी सारख्या असतात यांचे व्यक्तिमत्व खूप  उठावदार आणि हुशार असल्यमुळे लोक त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतात .मुलांक १ असणाऱ्या महिला उच्च अधिकारी स्थानावर असतात .मुलांक १ असणाऱ्या महिला खूप विचार  करून प्रत्येक गोष्ट करतात मनःजे त्या प्रेम पण विचार करून करतात त्या हुशार आणि कर्तुत्वान असणाऱ्या मुलावरच प्रेम करतात पण जास्त प्रमाणात या महिला  लव मेर्रेज करत नाहीत .

मुलांक १ चा स्वामी हा सूर्य असल्यमुळे या लोकांनी नेहमी वेळेला महत्व द्यावे यांनी सुर्यादय होण्याच्या आधी उठावे जे लोक सुर्यादय झाल्यनंतर उठतात त्याचा सूर्य खराब होतो .

सूर्याला  जल अर्पण करावे .

हनुमान चालीसा वाचावी .

आपल्या वडिलांना डाळिंब भेट मानून द्या आणि त्यांच्या रोज पाया  पडा .

लकी रंग –

 लाल ,केशरी ,पिवळा ,पांढरा,गोल्डेन

मुलांक १ असणारे  लोकांना शक्यतो मुलांक १ शी लग्न करणे टाळावे तसा तर नंबर खूप चांगला आहे पण दोघेही ह्या नंबर चे असतील तर त्याचे दोघांचे हि जे स्वभाव दोष  आहेत म्न्ह्जे अहंकार , सगळीकडे  वर्चस्व  असावे  असे वाटने त्यामुळे त्यांचात वाद होऊ शकतात आणि दोघान पैकी एक जिंकणे  खूप अवघड आहे,त्यांचासाठी मुलांक ३ , मुलांक ५ आणि मुलांक ६ सुटेबल असतील लग्नासाठी .